Kinwat-Mahur constituency : विधानसभेचा बिगुल वाजला ; किनवट-माहूर मतदार संघात सद्यातरी सन्नाटा -NNL
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| विधानसभेचा बिगुल वाजला २० नोव्हेंबरला मतदान होणार व २३ नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल लागणार आहे. मात्र या विधानसभेच्या बिगुलामध्ये किनवट-माहूर मतदार संघात सद्यातरी सन्नाटा पसरलेला आहे. महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदारांना संधी मिळणार की त्यांना डावलणार? तर महायुतीतर्फे विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देणार की डावलणार? की नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार? याकडे किनवट-माहूर विधानसभा मतदार संघाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून निवडणूक आयोगाने सुध्दा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. त्याअनुषंगाने आता किनवट-माहूर मतदार संघात कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष वेधल्या जात आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या (शरद पवार) माजी आमदार प्रदीप नाईक यांचा २०१९ मध्ये महायुतीच्या मदतीने विद्यमान आ.भिमराव केराम य...

