लोहा| तालुक्यातील मौजे बोरगाव रस्ता सोनखेड, जिल्हा नांदेड येथील फिर्यादीस चाकूचा धाक दाखवून जबरीने कार पळवून नेल्याप्रकची घटना दिनांक २६ रोजी घडली होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी गजानन रमेश पवार, वय 22 वर्ष याचा पाठलाग करून अवघ्या काही तासातच आरोपीला कार सह ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त से कि, सोनखेड तालुका लोहा येथील आयुर्वेदिक औषध विक्रेता जोगिंदरसिंग सुलतानसिंग चितोडिया वय ३३ वर्ष रा.बाणखेडा जिल्हा अमरावती हे आपल्या पत्नीसह आयुर्वेदिक दुकान थाटून येथे तात्पुरते थांबले होते. दिनांक २६ ऑगस्टच्या रात्री आरोपी गजानन रमेश पवार, वय 22 वर्ष हा येथे आला. औषध विक्रेते व त्याची पत्नी याना मारहाण करून चाकूचा धाक दाखवीत त्यांची जुनी वापरती गाडी क्रमांक एम एच 02 NA 3109मारुती सुझुकी 800 किमती अंदाजे 1,50,000 रुपयाची ही त्याचे ताब्यातून जबरीने घेऊन पळून गेला.
अशी फिर्याद वरून सोनखेड पोलिसांनी याबाबतचा गुन्हा दखल केला आणि आरोपीच्या तपासासाठी सीसीटीव्ही परिसरातील कॅमेऱ्याची तपासणी करून अवघ्या काही तासातच आरोपीला मुद्देमालसह अटक केला आहे.