नांदेड l शहरातील गांधी नगर येथील दलित मित्र धनाजीराव घोडजकर सभागृहात १९ ऑक्टोबर रोजी घरेलू कामगार संघटनेचे ७ वे अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीटू राज्य सचिव तथा जिल्हाध्यक्षा कॉ. उज्वला पडलवार ह्या होत्या. सीटू जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी उदघाटन कले. तर प्रस्ताविक सरचिटणीस कॉ.करवंदा गायकवाड यांनी केले.


प्रमुख पाहुणे म्हणून जनवादी महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कॉ. लता गायकवाड, जनवादी चालवळीच्या नेत्या कॉ.संगीता गाभने, डिवायएफआयचे तालुका अध्यक्ष कॉ.जयराज गायकवाड, उपाध्यक्ष कॉ.सुभाषचंद्र गजभारे, एसएफआयचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल कऊडकर, कॉ.राहुल नरवाडे आदींची उपस्थिती होती.


सन २००४ मध्ये कॉ. विजय गाभने यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हा घर कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली असून हे संघटनेचे सातवे अधिवेशन होते. या अधिवेशनात पुढील तीन वर्षासाठी १७ सदस्यांची कमिटी निवडण्यात आली आहे. यावेळी घरेलू कामगारांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली आहे.


नांदेड शहरातील पूरग्रस्तांचा लढा हा घरेलू कामगारांनी सुरु केला असून अनेक घरेलू कामगारांना अनुदान पात्र यादीतून मनपा आणि तहसीलने डावलले असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला. २० ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करून राहिलेल्या पूरग्रस्तांची नावे पात्र यादीत समाविष्ट करावीत व अनुदान मंजूर करावे यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी सर्वानुमते घेण्यात आला.

खऱ्या पूरग्रस्तांची दिवाळी गोड व्हावी यासाठी सीटू आणि माकप ने आतापर्यंत ५० आंदोलने केली असून हे आंदोलन ५१ वे असणार आहे. सदरील अधिवेशनात अध्यक्षपदी कॉ.गंगाधर गायकवाड, कार्याध्यक्पदी कॉ. उज्वला पडलवार, सरचिटणीसपदी कॉ.करवंदा गायकवाड, कोषाध्यक्षपदी सुंदरबाई वाहुळकर, उपाध्यक्षपदी ललिता लोखंडे,विद्या खंदारे,सचिवपदी अरुणा हटकर आदींची एकमताने निवड करण्यात आली.


