Homeनांदेडवाई बाजार येथे तालुकास्तरीय 'योजनेचा जागर' कार्यशाळा संप्पन्न -NNL

वाई बाजार येथे तालुकास्तरीय ‘योजनेचा जागर’ कार्यशाळा संप्पन्न -NNL

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे, शिक्षणाधिकारी (योजना) जि.प.नांदेड मार्फत राबविण्यात येणाऱ्या विवीध विद्यार्थी लाभाच्या योजना संदर्भात ‘योजनेचा जागर’ कार्यशाळा दि.५ जुलै रोजी जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा वाई(बा.)येथे मा.शिक्षणाधिकारी (योजना) जि.प.नांदेड दिलीप बनसोडे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली .

दिलीप बनसोड यांच्या मार्गदर्शनात इयत्ता ६वी ते १०वी मधील विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या विविध योजनाना प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व माध्यमातील जि.प.व खाजगी माध्यमिक मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व विषय तज्ञ यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थी लाभाच्या योजना सर्व स्तरांतून परिणाम- कारकपणे राबविण्यात याव्यात व त्यापासून कुणी वंचित राहणार नाही याबाबत सर्वांनी जागरुक राहून कार्य करावे असे आवाहन कार्यशाळेचे अध्यक्ष दिलीप बनसोडे यांनी केले.

तसेच दुर्गम-डोंगरी-अदिवासी भागातील विद्यार्थी वर्गासाठी स्वतःला झोकून द्यावं लागेल तसेच या समाजाचं आपण सर्वांना देणं लागतं ते आपल्या कार्यातून आपण पूर्णत्वास न्यावं असेही ते म्हणाले. या कार्यशाळेस माधव शेंबाळे सहाय्यक योजना अधिकारी, रुस्तुम शेख,तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी क्रिष्णा भराडीया, विस्तार अधिकारी सुधीर गुट्टे,सुचिता खल्लाळ,राजू मुधोळकर केंद्र शाळा वाई चे मुख्याध्यापक दिगांबर शिंदे यांच्यासह सर्व माध्यमातील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि साधनव्यक्ती गटसाधन माहूर हे उपस्थित होते.

यावेळी माधव शेंबाळे सहाय्यक योजना अधिकारी यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या विविध शिष्यवृत्या तसेच रुस्तुम शेख यांनी विविध लाभाच्या शासनाच्या योजनांच्या संदर्भात माहीती देताना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे तालुकाध्यक्ष एस.एस.पाटील यांनी तर गटशिक्षणाधिकारी क्रिष्णा भराडीया यांनी आभार मानले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments