धार्मिकनांदेड

Geeta Pathshala : महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर हिमायतनगरात गीता पाठशाळेची स्थापना

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| महाशिवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत हिमायतनगर शहरातील वॉर्ड क्रमांक ९ मध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय अंतर्गत गीता पाठशाळा तथा ‘ॐ शांती’ ज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आली. चायल परिवाराच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या या ज्ञान केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून गीता पाठशाळेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दीप प्रज्वलन झाले. संपूर्ण परिसर ‘ॐ शांती’च्या घोषाने व सकारात्मक ऊर्जेने भारावून गेला होता. यावेळी शीतल दीदी व सिंधू दीदी यांनी ब्रह्माकुमारी संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या सनातन ज्ञानमार्ग, आत्मशांती, नैतिक मूल्ये व जीवन परिवर्तनाच्या संदेशावर सखोल मार्गदर्शन केले.

श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, नगरसेवक डॉ. राजेंद्र वानखेडे, श्यामजी रायेवार सर, यांनीही आपल्या भाषणातून गीता पाठशाळेचे समाजातील महत्व अधोरेखित केले.

IMG20260215100830 scaled Geeta Pathshala : महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर हिमायतनगरात गीता पाठशाळेची स्थापना
oplus_2097152

या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक अमोल भगत, हिमायतनगरचे उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, अक्कलवाड सर, वऱ्हाडे सर, राजू रामदिनवार यांच्यासह शहरातील अनेक माताजी, भाईजी व बहनजी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

IMG20260215103955 01 Geeta Pathshala : महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर हिमायतनगरात गीता पाठशाळेची स्थापना
oplus_0

अध्यात्म, शिस्त, सदाचार आणि आत्मचिंतन यांचा संगम असलेली ही गीता पाठशाळा नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गजानन चायल यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व नागरिकांचे आभार मानले.

IMG20260215101229 01 Geeta Pathshala : महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर हिमायतनगरात गीता पाठशाळेची स्थापना
oplus_0

महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेली ही गीता पाठशाळा हिमायतनगर शहराच्या आध्यात्मिक व सांस्कृतिक जीवनात नवे तेज आणणारी ठरेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!