RTO office : आरटीओ कार्यालयातील सेवा मिळणार फेसलेस सुविधेद्वारे -NNL

नांदेड| महाराष्ट्र राज्य मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेने संप पुकारला आहे. याकाळात नागरिकांना आपले अर्ज आधार लिंक भ्रमणध्वनी क्रमांकाचा येणाऱ्या ओटीपी क्रमांकाचा वापर करून फेसलेस सेवेद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. जेणेकरुन आपली गैरसोय न होता कामकाजात विलंब होणार नाही. नागरिकांनी फेसलेस सुविधेचा वापर करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांनी केले आहे.

मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी पुकारलेल्या 24 सप्टेंबर 2024 पासून राज्यव्यापी बेमुदत संपात प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथील कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथील कामे खोळंबू नये यासाठी नागरिकांना ऑनलाईन सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

नागरिकांचे कामकाज सुरळीत होण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्त्या केल्या आहेत. शासनाद्वारे परिवहन विभागातील 38 सेवा या नागरिकांच्या सोईसाठी व कार्यालयात प्रत्यक्ष न येता कामकाज होण्याकरिता फेसलेस स्वरुपात सेवा सुरु केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कामाकरिता या कार्यालयात प्रत्यक्ष न येता विभागाच्या https://sarathi.parivahan.gov.in लायसन्साठी व https://parivahan.gov.in/parivahan वाहनासाठी या संकेतस्थळावरुन अर्ज करु शकता, असेही आवाहन करण्यात आले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button