
नांदेड l नांदेड मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने सर्व साधारण सभेत सभासद गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विभागीय कराटे स्पर्धेत सम्राट नरेंद्र शिंगे याने गोल्ड मिडल मिळविल्या बदल सत्कार करण्यात आला.


नावामनपाची सर्व साधारण सभा कै. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम नांदेड येथे ८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती,यावेळी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, ऊपायुक्त अजितपाल संधु,माजी सेवानिवृत्त ऊपायुक्त रत्नाकर वाघमारे, यांच्या सह मान्यवर यांच्या हस्ते सम्राट नरेन्द्र शिंगे याने वीर कराटे मार्शल आर्ट अकॅडमी मध्ये सेनसाई मनोज पतंगे ,संगम बोरकर सृष्टी पांचाळ यांचे मार्गदर्शन लाभले असून सम्राट याची वयाच्या बाराव्या वर्षी याचा तीन वेगवेगळ्या शालेय खेळामध्ये विभागीय स्तराला निवड झाली आहे.

तसेच आतापर्यंत 15 टूर्नामेंट मध्ये त्याला गोल्ड मेडल प्राप्त केले याबद्दल त्यांचे संतोष नांगरे डॉ संतोष जटाळे त्याचे पालक नरेंद्र जयराम शिंगे
आजोबा जयराम साधू शिंगे काका महेश जयराम शिंदे , सुनील एकनाथ गायकवाड , नथुराम चौरे यांनी त्याच्या पुढील वाटचालीस त्याला शुभेच्छा दिल्या





