Vijay Lohabande ; विजय लोहबंदे यांची एसएफआयच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड
नांदेड l एसएफआय विद्यार्थी संघटनेचे १९ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन नुकतेच अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे पार पडले. या अधिवेशनात एसएफआय विद्यार्थी संघटनेची नवीन कार्यकारणी करण्यात आली.यात नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र आणि विद्यार्थी चळवळीतील एक परिचित चेहरा, विजय लेहबंदे यांची स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या विद्यार्थी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे नांदेडसह संपूर्ण राज्यातील विद्यार्थी संघटना आणि पुरोगामी चळवळीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विजय लोहबंदे यांनी आजवर विद्यार्थी हितासाठी अनेक आंदोलने आणि चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांची तळमळ, संघटन कौशल्य आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची सखोल जाण यामुळे ते विद्यार्थी वर्गात लोकप्रिय आहेत. एसएफआयच्या राज्य उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याने, व...
