नांदेडमहाराष्ट्र

Majhi Ladki Bahin ; भोकर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शनिवारी मुख्य सोहळा – NNL

नांदेड| मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी (दि. 17) बालेवाडी (पुणे) येथून होणार आहे. यानिमित्त नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजता पालकमंत्री गिरीश महाजन, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण व अन्य मान्यवर लोकप्रतिनिधी तथा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यस्तरीय समारंभामध्ये नांदेड जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना सहभागी होता यावे, यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे बालेवाडी येथील समारंभाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थी महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्याची कार्यवाही करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचाही यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात गौरव करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यस्तरीय कार्यक्रमातील नांदेड जिल्हास्तरीय कार्यक्रम भोकर बाजार समितीच्या परिसरातील हॉलमध्ये होणार आहे. याशिवाय पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध लोकार्पण कार्यक्रमाचे भोकर शहरात आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये भोकर विश्रामगृहाचे लोकार्पण,राज्य मार्गाचे हुडूको अंतर्गत सुधारणा, पिंपळडोह तलाव उंची वाढविण्याच्या कामाचे भूमिपूजन, सार्वजनिक बांधकाम विभागीय कार्यालयाचे लोकार्पण, तहसील व उपविभागीय कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचे भूमिपूजन, शंभर खाटांच्या रुग्णालयाच्या श्रेणीवर्धन, अंतर्गत निवासस्थानाचे बांधकाम, भोकर येथील तलावाचे सुशोभीकरण, आयटीआय इमारतीचे लोकार्पण, संत सेवालाल महाराज स्मारकाच्या बांधकामाचे भूमिपूजन व जिल्हा परिषद मैदानावर सभा असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!