20 percent share fund ; २० टक्के शेस निधी अंतर्गत योजनेतील लाभार्थ्यांची निवड करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी -NNL
हिमायतनगर। समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत चालू असलेली २० टक्के शेस निधी अंतर्गत योजनेतील लाभार्थी निवड यादी ही बोगसरीत्या तयार करण्यात आली असून काही तालुक्यांना जास्तीचे लाभार्थी दिले व हिमायतनगर तालुक्यातील लाभार्थी कमी प्रमाणात निवडले याबाबत निवड करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी अर्जदार गंगाधर गायकवाड,विजय वाठोरे,अनिल कांबळे यांनी निवेदन हिमायतनगर चे गटविकास अधिकारी प्रल्हाद जाधव यांच्यामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारीजि. प. नांदेड व जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
नांदेड जिल्ह्यातील पंचायत समिती मार्फत सर्व तालुक्यांमध्ये चालू असलेली योजना २० टक्के शेस निधी अंतर्गत योजनेतील लाभार्थी निवड यादी ही जिल्हा परिषद येथील समाज कल्याण विभागात लावण्यात आली आहे. या यादीवरून हिमायतनगर तालुका सोडता इतर सर्व तालुक्यांमधील लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात वाव देण्यात आलेला दिसून य...
