नांदेडराजकीय

Himayatnagar Taluka Nationalist Party : हिमायतनगर तालुका राष्ट्रवादी (अजित पवार गट) अध्यक्षपदी वामनराव पाटील, शहराध्यक्षपदी अमोल धुमाळे

हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) हिमायतनगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) तालुकाध्यक्षपदी वडगाव येथील वामनराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे, तर शहराध्यक्षपदी अमोल पाटील धुमाळे यांची निवड करण्यात आली आहे. नुकतेच वरिष्ठांकडून या दोघांना नियुक्तीपत्र प्राप्त झाले आहे.

वामनराव पाटील यांनी अल्पावधीतच पक्ष संघटनेत सक्रियपणे काम करत वरिष्ठांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार तथा आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर यांनी केली.

वामनराव पाटील आणि अमोल धुमाळे यांच्या या निवडीबद्दल त्यांच्या मित्रपरिवार, कार्यकर्ते आणि शुभेच्छुकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ही निवड येत्या नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाची मानली जात आहे. दरम्यान, हिमायतनगरचे माजी तालुकाध्यक्ष अभिषेक लूटे यांना वरिष्ठ पदावर बढती देण्यात आली असून, जिल्हा कमिटीमध्ये त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button