The media should give balanced justice : माध्यमांनी सर्व उमेदवारांना समतोल न्याय द्यावा – राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीनी व्यक्त केली अपेक्षा -NNL
नांदेड, अनिल मादसवार| लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये मुद्रीत व अन्य सर्व माध्यमामध्ये सर्व उमेदवारांना प्रसिध्दीचा समतोल न्याय मिळावा, अशी अपेक्षा काही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीनी आज झालेल्या बैठकीमध्ये व्यक्त केली. या संदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी माध्यमांना सर्व उमेदवारांना समतोल न्याय देण्याचे आवाहन केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला सामान्य, खर्च आणि पोलीस निरीक्षकांची उपस्थिती होती. यात श्रीमती बी. बाला माया देवी (भाप्रसे), शेलेंद्रकुमार (भाप्रसे), श्रीमती पल्लवी आकृती (भाप्रसे), रण विजय यादव (भाप्रसे), कालु राम रावत (भापोसे), मृणालकुमार दास (आयआरएस), मयंक पांडे (आयआरएस), ए. गोविंदराज (आयआरएस) त्यांच्यासोबतच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, सहायक जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा, जिल्हा पोलीस अध...
