करियरनांदेड

Rajendra Hanawate : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे राजेंद्र हनवते यांची ब्लड बँकमध्ये असिस्टंट पदी निवड

हिमायतनगर| तालुक्यातील खडकी (बा.) येथील गरीब कुटूंबातील राजेंद्र यशवंत हनवते यांची महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर या ठिकाणी रक्तपेडी (Blood Bank ) मध्ये Attendent (Assitant) पदी निवड झाली.

त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा खडकी (बा) या ठिकाणी झाले आणी 10 वी पर्यंतच शिक्षण माझ्या गाविच पूर्ण झाले व 11 वी व 12 वी ते B com पर्यंतच शिक्षण हिमायतनगर येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर येथे झाले. तर पुढील शिक्षण M com हे पिपल्स कॉलेज नांदेड या ठिकाणी झाले.

घरची परिस्थिती जेमतेम वडील खडकी येथील ग्रामपंचायत मध्ये सेवक म्हणून काम करतात तर आई ही गृहिणी आहे भाऊ खाजगी मायक्रो फायनस मध्ये आहे. तर ते राज्य मराठी पत्रकार परिषद चे मराठवाडा विभाग चे अध्यक्ष शुद्धोधन हनवते यांचे चुलत भाऊ आहेत. त्यांच्या निवडी मुळे मित्र परिवारा कडून अभिनंदनाच वर्षाव होत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button