नांदेडक्राईम

smuggling illegal foreign liquor : विशेष पथकाने अवैध विदेशी दारूची चोरटी वाहतुक करणाऱ्या 3 आरोपीस घेतले ताब्यात -NNL

नांदेड| पोलीस अधिक्षक, नांदेड यांचे विशेष पथकाने अवैध विदेशी दारूची चोरटी वाहतुक करणाऱ्या 3 आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

नांदेडचे पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी (Operation flush out) अंतर्गत नांदेड जिल्हयात बेकायदेशिर व्यवसायांना आळा घालण्यासाठी कारवाई करणे करीता विशेष पोलीस पथकांना आदेश दिले होते, त्याअनुषंगाने विशेष पथक क 06 मधील पोउपनि / पो. एम. हालसे, पोहेकॉ ब्रम्हानंद लामतुरे, पोकॉ राम मुळे, पोकॉ महाचंद्रमनी कांबळे, पोकॉ तुकाराम जुन्ने. पोकॉ महेश कावळे असे दि. 30 सप्टेबर रोजी रात्री अवैध व्यवसायाची माहिती काढुन केसेस करणे कामी अर्धापुर हद्यीत गस्त घालऱ्यांच्या सूचना केल्या होत्या.

त्यानुसार गस्तीवर असताना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी महादेव पिंपळगाव फाटा येथे एक फोर्ड फ्रिस्टाईल कंपनीची चॉकलेटी रंगाची कार जिचा पासिंग क्र. MH-26 BQ 6768 असा असलेली कार थांबवुन गाडीची पाहणी केली असता सदर वाहनात कार चालक 1. दिपक सुर्यकांत पेदावार रा. भाग्यनगर, नांदेड 2. प्रितेश सुभाष नाथेवाड रा. नवामोंढा. नांदेड 3. शेख जाहिद शेख सफिरोधीन रा. कॉटई तहसिल पुर्वा मेदनापुर (पश्चिम बंगाल) असे सदर गाडीमध्ये मिळुन आले.

त्या गाडीची बारकाईने पाहणी केली असता त्यामध्ये विविध विदेशी कंपनीच्या दारूच्या सिलंबंद बॉटलचे सहा बॉक्स व ईतर सिलबंद बॉटल असा एकुण 53,915/- रूपयाची विदेशी दारू व वाहतुक करणारे वाहन किं. 5,50,000/- असा एकुण 6,03,915/- रूपयाचा मुद्देमालासह अवैध विदेशी दारूची वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने जप्त करण्यात आले असुन पो.स्टे. अर्धापुर येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदरची कामगीरी अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर, उदय खंडेराय, पोनि स्थागुशा यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथक 06 मधील पोउपनि श्री हालसे. पोहेकॉ ब्रम्हानंद लामतुरे. पोकॉ राम मुळे, महाचंद्रमनी कांबळे, तुकाराम जुन्ने, महेश कावळे यांनी पार पाडली. विशेष पथक क्र.06 यांचे वरीष्ठांनी अभिनंदन केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button