Mr. Indranil Naik : हरितक्रांतीचे जनक स्व.वसंतराव नाईक यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करणार-ना.इंद्रनील नाईक
नांदेड| गावकुशीच्या बाहेर तांडा वस्तीवरील बंजारा समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करण्यासाठी स्वर्गीय वंतराव नाईक यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन वाडी तांड्यावर शिक्षणाची दालने खुली केली. बंजारा समाजाबरोबरच पददलीत समाजाच्या उन्नतीसाठी धोरणात्मक निर्णय राबविल्यामुळे सर्वांगीण विकास साधता आला. त्यांचेच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही सत्तेचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी करणार असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी येथे केले.
जिल्ह्यातील बंजारा समाज व कर्मचारी संघटनेच्यावतीने ना.इंद्रनील नाईक व आ. तुषार राठोड यांचा भव्य नागरी सत्कार जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे 1 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी मुखेड मतदारसंघाचे आ.डॉ.तुशार राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. ना.इंद्रनील नाईक पुढे बोलतांना म्हणाले, बंजारा समाजाच्...
