Western Regional Youth Festival : ‘स्वारातीम’ विद्यापीठाला पश्चिम विभागीय युवा महोत्सवात पाच पारितोषिके -NNL
नांदेड| अखिल भारतीय विद्यापीठ संघ आणि मेहसाणा (गुजरात) येथील गणपत विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सतरंग’ हा आंतर राज्यस्तरीय पश्चिम विभागीय युवा महोत्सव दि. ०४ ते ०८ जानेवारी या कालावधीत नुकताच संपन्न झाला.
या महोत्सवात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ४० विद्यार्थी कलावंतांनी एकूण २१ कला प्रकारांमध्ये सहभाग घेतला होता. नृत्य, नाट्य, संगीत व ललित कला या प्रकारामध्ये विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला आदिवासी नृत्य, शास्त्रीय तालवाद्य, शास्त्रीय सुरवाद्य, मेहंदी व मिमिक्री या कला प्रकारात नैपुण्य मिळवत विद्यापीठाला पाच पारितोषिके मिळवून दिली आहेत. शिवराज मुधोळ (मेहंदी) द्वितीय, अर्जुन पवार ...
