Madhavrao Patil Zarikar ; स्वच्छता दुत माधवराव पाटील झरीकर यांचे वृध्दपकाळाने निधन.. – NNL
नवीन नांदेड| लोहा तालुक्यातील निर्मल ग्राम झरीचे माजी सरपंच माधवराव कामाजी पाटील झरीकर यांचे वृध्दपकाळाने राहत्या घरी झरी येथे १४ आगस्ट रोजी सकाळी १० वाजता निधन झाले असून निधन समयी त्याचे वय ६९ वर्ष होते, त्याचा पश्चात पत्नी,दोन मुले, दोन मुली, भाऊ बहिण असा परिवार असून सायंकाळी ५ वाजता झरी स्मशानभूमीत हजारो नागरीकाच्या उपस्थित शोकाकुल वातावरण मध्ये
अंत्यसंस्कार करण्यात आले.
लोहा तालुक्यातील झरी गावातील ग्रामपंचायत सरपंच म्हणून २००० ते २००५ सरपंच म्हणून माधवराव पाटील झरीकर यांनी सरपंच म्हणून कारभार सांभाळला तर पत्नी सुमनताई झरीकर यांनी २०१० पर्यंत सरपंच पद सांभाळले, या काळात राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते झरी गावाला निर्मल ग्रामपंचायत पुरस्कार घेतला तर शासनाच्या अनेक पुरस्कार ग्रामपंचायत यांना मिळवून दिले आहेत, सेवा सोसायटी चेअरमन म्हणून ही कारभार सांभाळला, स्वच्छता दुत म्हणून महा...
