नांदेडधार्मिक

Gajanan Maharaj Temple ; सिडको येथील गजानन महाराज मंदिरात प्रकट दिनानिमित्त भव्य मिरवणूक व महाप्रसाद आयोजन

नवीन नांदेड l गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त 20 फेब्रुवारी रोजी सिडको येथील संत गजानन महाराज मंदिर संभाजी चौक सिडको येथे महाअभिषेक व भव्य मिरवणूक व महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते,तर हडको येथील गजानन महाराज मंदिर येथेही प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

दरवर्षी प्रमाणे याही 25 व्या वर्षी 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 8 श्रींच्या अभिषेक अरूण कुलकर्णी महाराज यांच्या मंत्रोच्चार करून केला,8 ते 10 होमहवन व सकाळी 10ते 1 यावेळी गजानन महाराज पालखी व गजानन महाराज फोटो असलेली भव्य मिरवणूक सिडको संभाजी चौक,संत गाडगेबाबा महाराज मंदिर, बालाजी मंदिर,महाराणा प्रतापसिंह पुतळा ,महाविर चोख, मार्ग मंदिर परिसरात मिरवणूक काढण्यात आली यावेळी ढोल ताशा गजर, फटाक्यांची आतिषबाजी मध्ये व काळा हनुमान मंदिर सिडको हडको भजनी मंडळ व महिलांच्या समावेश असलेली मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुक संपन्न झाल्यानंतर महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते, यावेळी पिठलं भाकरी यांच्या महाप्रसाद शैकडो भाविक भक्तांनी घेतला.

हडको येथील गजानन महाराज मंदिर येथे प्रकट दिनानिमित्त महाअभिषेक व पुजा करण्यात आली दुपारी महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते,प्रकट दिनानिमित्त दोन्ही मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button