Thursday, May 14

Tag: Snake rescuer or drug lord? The identity

Crime patrol : सर्पमित्र की ड्रग्स डॉन? सोशल मीडियावरची ओळख निघाली बनावट

Crime patrol : सर्पमित्र की ड्रग्स डॉन? सोशल मीडियावरची ओळख निघाली बनावट

क्राईम
अहिल्यानगर, प्रतिनिधी| सोशल मीडियावर स्वतःला सर्पमित्र, पर्यावरणप्रेमी व समाजसेवक म्हणून सादर करत लाखो लोकांचा विश्वास संपादन करणारा युट्यूबर आकाश जाधव अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. सापांचे रेस्क्यू दाखवून लोकप्रियता मिळवणाऱ्या या युट्यूबरमागे कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थांचे काळे साम्राज्य दडले असल्याचा धक्कादायक पर्दाफाश छत्तीसगडच्या महासमुंद जिल्हा पोलिसांनी केला आहे. 7 जानेवारी रोजी कोमाखान पोलिसांनी संशयावरून थांबवलेल्या एका रुग्णवाहिकेत तपासादरम्यान तब्बल 5 क्विंटल 20 किलो गांजा आढळून आला. या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 2 कोटी 60 लाख रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे, रुग्णवाहिकेचा वापर करून चेकपोस्ट सहज पार करण्यासाठी गांजाची तस्करी केली जात होती, ही बाब तपासात उघड झाली आहे. या प्रकरणाच्या चौकशीतून आकाश जाधव (रा. अहिल्यानगर, महाराष्ट्...
error: Content is protected !!