Sachin Kasliwal : बेकायदेशीर कीटकनाशक विक्रीचा बाऊ करत प्रिन्सिपल प्रमाणपत्र न देणाऱ्या कंपन्यावर त्वरित कारवाई करा : सचिन कासलीवाल -NNL
नांदेड| जिल्ह्यात व राज्यामध्ये बेकायदेशीर रित्या विविध कंपन्या ह्या लहान कृषी सेवा केंद्र चालकांना प्रिन्सिपल प्रमाणपत्र न देता त्याचवेळी आपल्या वितरकांमार्फत बाजारामध्ये अनेक कृषी सेवा केंद्रांना आपले कीटकनाशक उपलब्ध करून देतात आणि खरेदी सोबतच वितरक प्रिन्सिपल सर्टिफिकेट न देता त्या लहान व्यापाऱ्याला एक प्रकारे फसविण्याचे काम करतात या कामात मोठमोठ्या कीटकनाशक कंपन्या सुद्धा सहभागी आहेत हेच या एकंदरीत कारस्थानावरून लक्षात येते असा घणाघाती आरोप पत्रकार परिषदेत किसान जन आंदोलन भारत चे संस्थापक अध्यक्ष सचिन कासलीवाल यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, अशा प्रकारे विविध कीटकनाशक कंपन्या या आपल्या मनमानी धोरणाची मार्केटमध्ये अंमलबजावणी करतात व लहान लहान कृषी सेवा केंद्र धारकांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची धमकी अधून मधून देत असतात हे योग्य नाही असे कासलीवाल यांनी सांगितले. पुढे त्यांनी सा...

