Sunday, May 17

Tag: protesting women occupied the chair

In Himayatnagar tehsil office : हिमायतनगर तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्या अनुपस्थितीत आंदोलक महिलांनी घेतला खुर्चीचा ताबा -NNL

In Himayatnagar tehsil office : हिमायतनगर तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्या अनुपस्थितीत आंदोलक महिलांनी घेतला खुर्चीचा ताबा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| मागील काही महिण्यापासून हिमायतनगर तालुक्यात प्रशासकीय कार्यालये ओस पडत आहेत. अनेक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरीकांना रिकाम्या हाताने गावाकडे परतावे लागत आहे. तालूका दंडाधिकारी कार्यालयात तहसीलदार यांची सततची अनुपस्थिती राहत असल्याने नागरिकांची प्रचंड हेळसांड होत असून, दि. ७ रोजी तहसील कार्यालयात आलेल्या महिला आंदोलकांनी प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त करीत चक्क तहसीलदार यांच्या खुर्चिचाच ताबा घेतला होता. हदगाव विधानसभा मतदार संघात येणाऱ्या हिमायतनगर तालुक्यात प्रशासकीय यंत्रना कुचकामी ठरत असून, अनेक कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्याच्या खुर्च्या दुपारनंतर रिकाम्या असलेल्या पहावयास मिळत आहेत. तालुक्यातील एकाही प्रशासकीय कार्यालयांवर लोक प्रतिनीधीची वचक राहीली नाही. त्यामुळे शेतकरी, निराधार, विद्यार्थी...
error: Content is protected !!