नांदेडकृषी

Women Farmer Died : हिमायतनगर तालुक्यातील मौजे पार्डी येथे वीज पडून महिला शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

हिमायतनगर, अनिल मादसवार | तालुक्यातील मौजे पार्डी येथे आज सायंकाळी सुमारे ५.३० वाजेच्या दरम्यान अचानक वादळी वारे व अवकाळी पावसाचा जोर सुरू असताना वीज कोसळून एका महिला शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशाखा सचिन येलकेवाड (वय अंदाजे ३० वर्षे) या शेतात हळद काढणीचे काम करत असताना ही दुर्घटना घडली.

तलाठी संजय बिऱ्हाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमायतनगर शहर व तालुका परिसरात अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होताच जोरदार कडकडाटासह वीज कोसळली. त्यात विशाखा येलकेवाड या गंभीर जखमी झाल्या. स्थानिकांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

या घटनेमुळे पार्डी गावासह संपूर्ण हिमायतनगर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. येलकेवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे. घटनेची माहिती तलाठी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली असून महसूल विभागाकडून सकाळी पंचनामा करण्यात येणार आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन व नैसर्गिक आपत्ती अनुदानाच्या माध्यमातून मृताच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button