
नांदेड| आठ वर्षा पासून श्रावण महिन्यात रतनगड रत्नेश्वरी वडेपुरी ते काळेश्वर पायी दिंडी काढली जाते. उद्या पहिला श्रावण सोमवार असून, दिनांक ५ तारखे पासून श्रावण मास प्रारंभ होत आहे. याच पार्श्वभूमीवर वडेपुरी ते श्री काळेश्वर ( विष्णुपुरी) अशी पायी दिंडी निघणार आहे.


या पायी दिंडीत मौजे वडेपुरी, ढाकणी, किवळा, वडगाव, टेळकी, कलंबर, दापशेड, हरबळ, सोनखेड. दगडगाव, जाणापुरी, खरबी, बामणी, मोहनपुरा, वाहेगाव, मारकंड, कल्हाळ, मुसलमानवाडी, डेरला, धनगरवाडी, विष्णुपुरी, पांगरी, नानकवाडी झरी. येथील भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे पहिला श्रावण सोमवार निमित्ताने श्री माता रत्नेश्वरी देवस्थान रतनगड मौजे वडेपुरी ते श्री काळेश्वर मौजे विष्णुपुरी पायी दिंडी निघणार आहे. सकाळी ६ वाजता प्रारंभ होणार आहे.

हि पाई दिंडी व्हाया जानापुरी, वाडीपाटी, असे विष्णुपुरी येथे दुपारी बारा वाजता.ही दिंडी पोहचेल. तत्पूर्वी विद्यापीठ गेटजवळ आल्या नंतर लंगरसाहिब नानकसर यांच्या वतीने नाष्टाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर परतीचा प्रवास दुपारी दोन वाजता सुरू होईल व्हाया नानकसर, झरी,यामागे सायंकाळी ६ वाजता रतनगड.रत्नेश्वरी येथे पायी दिंडी येईल. तेव्हा मोठ्या संख्येने भक्तांनी यात सहभागी वागावे असे आवाहन माता रत्नेश्वरी विश्वस्त मंडळ व वडेपुरी ग्रामस्थांनी केले आहे.





