कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय मंजूर (दिड महिन्याचा कालावधी झाले पण शहरात जागाच मिळेना) -NNL
किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट येथे अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाला मंजुरी मिळून दीड महिन्यांचा कालावधी लोटला आहे, पण न्यायालयासाठी शहरात तात्पुरती इमारत मिळत नसल्याने बिल्डिंगची फरफट कायम आहे. अनेक वर्षांनंतर अतिरिक्त व सत्र न्यायालय मंजूर झाल्याने पक्षकार व वकिलांनी समाधान व्यक्त केले आहे, पण लोकप्रतिनिधी आमदार, खासदार यांनी बिल्डिंग मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्हा मुख्यालयापासून किनवट हा तालुका दीडशे किलोमीटर अंतरावर आहे. येथे अतिरिक्त सत्र न्यायालय नसल्याने पक्षकाराची मोठी परवड व्हायची. सत्र न्यायालयाशी निगडित न्यायालयीन कामकाजासाठी गोरगरीबांना नांदेड येथे गेल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे वेळ व पैशांचा अपव्यय होत होता. आणखी हे काही थांबलेले नाही. किनवट हा आदिवासी डोंगराळ तालुका आहे. या तालुक्यासाठी अतिरिक्त सत्र न्यायालय नाही. ते इथे मंजू...
