On the occasion of bull paula festival : बैल पौळा सणाच्या निमित्ताने आकर्षक बैलजोडी मुर्ती गाय पुंजनासाठी सिडको भागात विक्रीसाठी उपलब्ध -NNL
नवीन नांदेड| बैल पोळा सणाच्या निमित्ताने घरोघरी पुंजनासाठी आकर्षक अशा बैलजोडी ,गाय मुर्ती विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात सिडको परिसरातील बाजार मध्ये विक्रीसाठी आल्या असून नागरीक युवक हे घेण्यासाठी व पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
२ सप्टेंबर रोजी शेतकरी सर्जा राजा असलेल्या बैल पोळा सणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करण्यात येतो तर अनेक परिवाराच्या निवासस्थानी आकर्षक व विविध आकारातील मुर्ती पुजन करण्यात येत असतो, ग्रामीण भागात शेतकरी हा सण विधीवत साजरा करत असतो, सणाच्या निमित्ताने अहमदनगर सह जिल्ह्यातील नांदेड, परभणी सातफेळ, तालुक्यातील अनेक गावातून मोठ्या प्रमाणात मुर्ती कलाकार यांच्या कडून आकर्षक व विविध कलाकृती बैलजोड मुर्ती बाजार उपलब्ध झाल्या आहेत.
तर सर्जा राजासाठी सजावटीसाठी विविध आकर्षक अशा अनेक झुल, सांज, दोरी, कवडी, गळ्यातील घंटा,भाषिंग य...
