Sant Sewalal Maharaj Tanda Vasti : खैरगाव ज. ग्रामपंचायतीतून होणाऱ्या संत सेवालाल महाराज तांडा वस्ती सुधारणा योजनेचे काम बोगस -NNL
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे खैरगाव ज. ग्रामपंचायत अंतर्गत होत असलेल्या संत सेवालाल महाराज तांडा वस्ती सुधारणा योजनेचे काम अत्यंत बोगसरीत्या होत आहे. उंटावरून शेळया हाकणाऱ्या ग्रामसेवकाकडून हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. अशी चर्चा व्हॅट्सऍपग्रुप सोशल मीडियावर होऊ लागावी असून, ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनाच्या वरिष्ठांनी भेट देऊन या कामाची चौकशी करावी अशी मागणी होऊ लागली आहे.
हिमायतनगर पंचायत समिती अंतर्गत मागील अनेक वर्षपासून विवीध ग्रामपंचायतीत कोट्यवधींच्या निधीतून सिमेंट काँक्रेट रस्ते, स्मशान भूमी शेड, समाज भवन, सभागृह यासह अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. मात्र होत असलेली बहुतांश कामे हि अत्यंत निकृष्ठ आणि अंदाजपत्रकाच्या बगल देऊन केली जात असल्याने त्या कामाची गुणवत्ता ढासळली असून, बहुतांश कामे अल्पवधीतच मा...
