farmer commits suicide : पाचुंदा येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहुर तालुक्यातील पाचुंदा येथील शेतकरी गौतम किशन पाटील वय 40 वर्ष यांनी कर्जबाजारीपणा व नापीकला कंटाळून राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केल्याने त्यांना किनवटच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना दि 10 रोजी घडल्याने खळबळ उडाली आहे

माहूर तालुक्यातील मौजे पाचुंदा येथील गौतम पाटील हे अल्पभूधारक शेतकरी होते मागील अनेक वर्षापासून शेतात नापिकी व कर्जबाजारीपणा झाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा या विचारात ते मागील अनेक दिवसापासून सतत चिंताग्रस्त होते दि 10/10/ 2025 रोजी सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान पाचुंदा येथील राहते घरी शेतकरी गौतम किशन पाटील यांनी विष पिल्याचे नातेवाईकाना कळताच त्यांना किनवट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांचा मुलगा वैदिक गौतम पाटील यांनी किनवटच्या पोलीस ठाण्यात अर्ज देऊन घटना कळविली.

त्यांचे पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार असून अल्पभूधारक शेतकरी असल्याने पावसामुळे प्रचंड नुकसान झाल्याने त्यांनी आत्महत्या केली असून माहूर तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून आणखी आत्महत्या होण्याची वाट न पाहता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन मयत शेतकऱ्यांच्या वारसांना तात्काळ शासकीय मदत द्यावी अशी मागणी होत आहे

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button