नांदेडमहाराष्ट्र

Citizens Anger : गायब नगरसेवकांवर नागरिकांचा संताप — नांदेड शहरात ‘जागरूक नागरिकां’चे बॅनर चर्चेत

नांदेड| आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक ६ गणेश नगर परिसरात नागरिकांनी ‘जागरूक नागरिक’ या नावाने लावलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

या बॅनरमधून नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, मनपा निवडणूक २०१७ मध्ये निवडून आलेले आणि गेले ८ वर्षांपासून प्रभागातून गायब असलेले नगरसेवक आता इच्छुक उमेदवार म्हणून फिरू नयेत.”

तसेच नागरिकांनी आणखी काही ठोस मागण्या केल्या आहेत.  कोणत्याही पक्षाची उमेदवारी घेतली तरी मतदान करणार नाही. उमेदवार हा प्रभागात वास्तव्यास असलेला असावा. राजकीय पक्षांनी अशा निष्क्रिय उमेदवारांना उमेदवारी देऊ नये; अन्यथा परिणाम भोगावे लागतील.

या बॅनरवर शेवटी लिहिलेलं वाक्य नागरिकांच्या भावना अचूक व्यक्त करतं  “एक है तो सेफ है… बढ़ेंगे तो कटेंगे!” निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची ही भूमिका स्थानिक स्वराज्य संस्थांतील जनतेच्या अपेक्षा आणि जागरूकतेचे दर्शन घडवते. अशा प्रकारचे बॅनर आता इतर प्रभागांमध्येही लावले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button