Latur News : लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमआरआय आणि सिटीस्कॅन मशीन तातडीने उपलब्ध होणार
लातूर/मुंबई| लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमआरआय आणि
सिटी स्कॅन मशीन उपलब्ध करून दिले जाईल, (MRI and CT scan machines will be available immediately) असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना दिले आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या मुंबई येथे सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज गुरुवार दि. ३ जुलै २५ रोजी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमआरआय आणि सिटी स्कॅन मशीन मागच्या अडीच वर्षापासून बंद असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यामुळे सामान्य परिस्थितीतील रुग्णांचे प्रचंड हाल होत असल्याचे त्यांनी सांगितले. आता खाजगी भागीदारीतुन या मशीन उपलब्ध करून देण्याचा शासनाचा निर्णय घेतला आ...
