Mahavitaran : हिमायतनगरमध्ये महावितरणचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर
हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर शहर व तालुक्यात महावितरणच्या कारभारातील गंभीर गैरप्रकार उघडकीस आला असून, कोणतीही अधिकृत परवानगी, डिमांड नोट किंवा नोंद नसताना बसविण्यात आलेला एक अनधिकृत ट्रान्सफॉर्मर अखेर उपविभागीय कार्यालयात जमा करण्यात आला आहे. मात्र, इतर अनधिकृत डीपी अद्याप कार्यरत असून, एवढा मोठा प्रकार समोर येऊनही जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने उपोषणकर्ते व सर्वसामान्य वीजग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात महावितरणच्या कार्यपद्धतीतील गंभीर शिथिलता या प्रकरणातून स्पष्ट झाली आहे. अधिकृत प्रक्रियेशिवाय ट्रान्सफॉर्मर बसवणे हे थेट अपघाताला आमंत्रण देणारे ठरू शकले असते. दुसरीकडे, मागणी करूनही शेतकऱ्यांना दोन-दोन वर्षे ट्रान्सफॉर्मर व खांब मिळत नाही, तसेच सुरळीत वीजपुरवठाही होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने ...
