Ghuman Yatra : महाराष्ट्र आणि पंजाब मध्ये ऋणानुबंध निर्माण करणारी एकमेव चळवळ : ‘घुमान यात्रा‘ -NNL
महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्याचे अनोखे नाते आहे. राष्ट्र बलिदानाची आणि शेतीनिष्ठ परिश्रमाची पंजाब राज्याची खासियत तंतोतंत महाराष्ट्राशी जुळणारी आहे. या दोन्हीही राज्याच्या ऐतिहासिक संघर्षाची गाथासुध्दा खुपच प्रेरणादायी आहे. त्या सोबतच महाराष्ट्रात धर्मसुधारणेची चळवळ राबविणारे संत नामदेव यांच्या कार्याचा महिमा हा पंजाब आणि महाराष्ट्र राज्यांना जोडणारा आहे. भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन पंजाब पर्यंत गेलेल्या संत नामदेवांच्या सातशे वर्षापुर्वी सुरू केलेल्या राष्ट्रीय एकात्मतेच्या चळवळीला पुन्हा उजाळा देण्याचा प्रयत्न दरवर्षी न चुकता होतो ती म्हणजे नानक साई फाऊंडेशनची 'घुमान यात्रा' होय.
जेष्ठ पत्रकार तथा नानक साई फाऊंडेशनचे चेअरमन श्री पंढरीनाथ बोकारे यांच्या कल्पनेतुन घुमान यात्रेचे गेल्या १० वर्षांपासून सातत्याने नियोजन होत असते. खर म्हणजे महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातले सांस्कृ...
