protest against Parbhani incident ; परभणी घटनेच्या निषेधार्थ किनवटची बाजारपेठ कडकडीत बंद – NNL
किनवट, परमेश्वर पेशवे l परभणी घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरवादी संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला किनवट तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दिवसभर दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान हिंसाचार उफाळला होता यात पोलिसांनी अटक केलेल्या एका तरुणाचा पोलीस कस्टडी मृत्यू झाल्यानंतर विविध आंबेडकरी संघटनानी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.
या बंदला किनवट तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून व्यापाऱ्यानी स्वयंस्फूर्तीतिने दिवसभर कडकडीत बंद पाळला.शासकीय कार्यालय दवाखाने औषधी दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद होती. दुपारी आ...
