Shahaji Umap : हल्ल्यात शहीद झालेल्या जवान व नागरिकांच्या स्मृती जागवत करणारा उपक्रम स्तुत्य – पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप -NNL
नांदेड| मुंबईवर २६/११ रोजी झालेला दहशतवादी हल्ला आज सबंध देशावर आघात करणारा होता. हा हल्ला परतवून लावण्यासाठी महाराष्ट्र पोलीस व केंद्रातील एनएसजी कमांडो यांनी केलेले शर्थीचे प्रयत्न महत्वाचे होते. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवान व नागरिकांच्या स्मृती जागवत सुरु केलेला हा उपक्रम स्तुत्य असून, या कार्यक्रमाची व्याप्ती अशीच वाढो, अशा भावना नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी व्यक्त केल्या.
मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने पत्रकार विजय जोशी यांनी सुरु केलेल्या सैनिक हो तुमच्यासाठी या देशभक्तीपर गितांच्या श्रध्दांजली कार्यक्रमात उमाप अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. नांदेड पोलीस दल आणि संवाद संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस उपमहानिरीक्षक शहा...
