नांदेडराजकीय

Nanded-Nagpur National Highway block : नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन; कर्जमाफीसाठी तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

नांदेड| शेतकऱ्यांच्या विविध मागण्यां व केळीला हेक्टरी तीन लाखांची मदत देण्यात यावी मागणीसाठी शिव सेना ठाकरे गटाने नांदेड नागपूर रस्त्यावर चक्क जाम आंदोलन करत महायुतीच्या शासनाला विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली.शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.हे रास्ता रोको आंदोलन पिंपळगाव महादेव पाटी परिसरात करण्यात आले.या आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सरकार विरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला.

मराठवाड्यात शिवसेना ठाकरे गटाने महायुतीच्या सरकार विरोधात एल्गार पुकारला असुन क्या हुवा तेरा वादा’ म्हणत महायुतीच्या जाहिरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यात येत आहे.नांदेड जिल्हा शिवसेनेचा वतीने नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव महादेव पाटी परिसरात चक्क जाम आंदोलन करुन आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.या आंदोलनामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी तीन लाखांची मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, जिल्हाप्रमुख ,भुजंग पाटील डक, जिल्हाप्रमुख ज्योतिबा दादा खराटे डॉ.राम चव्हाण, उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे उपजिल्हाप्रमुख , वेंकोबा येडे, उपजिल्हाप्रमुख माणिक लोमटे, उपजिल्हाप्रमुख महेश पाटील उपजिल्हाप्रमुख डॉ बालाजी पेनुरकर जिल्हा प्रवक्ता, प्रकाश मारावर, अर्जुनसिंह ठाकूर शहरप्रमुख नांदेड द ,आनंद जाधव प्र.शहर प्रमुख नांदेड , सल्लाउद्दीन काझी( शहर प्रमुख अर्धापूर ), माजी सभापती नरहरी वाघ, सभापती सुनिल पा. कदम (.तालुकाप्रमुख नांदेड उत्तर(,पिंटू पाटील वासरीकर, (तालुकाप्रमुख मुदखेड, )संतोष कल्याणकर (अर्धापूर तालुकाप्रमुख,) पद्माकर सावंत (तालुकाप्रमुख दक्षिण), उमेश पाटील ( तालुकाप्रमुख मुखेड, /शंकर चिंतामवाड( मुखेड शहरप्रमुख,)

DSC 6334 Nanded-Nagpur National Highway block : नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन; कर्जमाफीसाठी तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

बालाजी खतमापुरकर तालुकाप्रमुख देगलूर, रामचंद्र रेड्डी (तालुकाप्रमुख धर्माबाद),विजय कल्याणकर,नंदू पाटील वैद्य, पिंटू सुनपे, नवनाथ जोगदंड, किशोर ठाकूर, माधव पांचाळ, लालचंद यादव,मनोज यादव, अशोक डांगे, रमेश क्षीरसागर, सदाशिव इंगळे, संभाजी देशमुख, सिमरन कालरा, बंडू देशमुख, नागनाथ महादपुरे, किरण देशमुख, करण इटगायळ, नितीन सरोदे, विश्वभर पवार,विश्वंभर पवार, माधव पावडे, अविनाश झमकडे, साहेबराव चव्हाण, गिरी महाराज, प्रकाश पाटील येडे, बाबुराव पाटील कांजाळकर, सचिन पाटील,मारोती कदम, रामदास भोजने, सुरेश पावडे, सोपान बोकारे, ईश्वर भाया जाधव, शेख नदीम, अमोल लोखंडे, वैभव गायकवाड, सोनू दमकुंडवार, आदित्य पाटील, शंतनू पाटील सावंत, गणेश शहाणे, प्रकाश संपत्ती, सुमेध कांबळे, सुनील कांबळे यांच्यासह शेकडो शिवसैनिक व शेतकरी सहभागी झाले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!