Kaliya Kirtan of Mahashivratri : भव्य शोभायात्रा व काल्याच्या कीर्तनाने महाशिवरात्रीच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता
हिमायतनगर, अनिल मादसवार| मागील आठ दिवसापासुन महाशिवरात्रीच्या निमित्ताने हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात सुरु असलेल्या अखंड हरिणाम, विना पहारा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची सांगता दि. ०३ मार्च रोजी ग्रामदिंडी व हभप. सोपान महाराज शास्त्री यांच्या मधुर वाणीतील काल्याच्या किर्तनाने करण्यात आली. याप्रसंगी ग्रामीण व शहरी भागातुन हजारोंच्या संख्येने श्री परमेश्वर भक्तांचा जनसागर लोटला होता.
ग्रंथराज पारायनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अखंड हरिणाम सप्ताह समाप्ती नीमीत्त दि.०३ मार्च रविवारी सकाळी ९ वाजता ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची पालखी दिंडी व्यासपीठाचार्य हभप शिवाजी महाराज वडगावकर यांच्या नेतृत्वाखील शहरातील मुख्य रस्त्यावरुन काढण्यात आली. या शोभा यात्रेत चिमुकल्या मुलीं डोक्यावर ज्ञानेश्वरी ग्रंथ व हाती भगवा ध्वज घेऊन बालके सामील झाले होते. तसेच टाळ मृदंगच्या गजरात श्री प...
