Grandson murdered grandmother : नातवाने आजीचा खून करून दागिन्यांसह रक्कम केली लंपास; हिमायतनगर तालुक्यातील टेम्भूर्णी येथील घटना
हिमायतनगर। तालुक्यातील मौजे टेम्भुर्णी येथे एका 75 वर्षीय वृद्ध आजीच्या तोंडात कापड कोंबून तिचा खून करून २ लक्ष ७४ हजार रुप्याचे दागिने व नागडी रक्कम घेऊन पसार झाल्याची घटना दिनांक ३ जून रोजीच्या रात्रीला घडली आहे. गयाबाई रामजी तवर असे मयत आजीचे नावं असून, याबाबत हिमायतनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर तालुक्यातील मौजे टेम्भुर्णी येथील महिला गयाबाई रामजी तवर/ देवसरकर या एकट्याच राहत होत्या. मयत महिलेच्या नावाने नऊ एकर जमीन व स्वतःचे घर आहे. तिन्हींही मुलींचे लग्न झालेले असल्याने त्या सर्वजण आपल्या सागरी राहतात. मयत गयाबाई रामजी तवर यांनी सोमवारी बैन्केतून ९० हजारांची रक्कम काढून आणली होती. तसेच मुलीकडे ठेवलेले २३ ग्राम सोन्याचे दागिने ०१ लक्ष ८४ हजार किंमत असलेले दागिने घेऊन घरी आली होती. याची खबर लागलेल्या मयत महिलेचा नातू मारोती उर्फ बाळ...
