नांदेडकरियर

10th exam ; इयत्ता दहावीच्या परीक्षा आजपासून सुरू विद्यार्थ्यांनी आनंददायी वातावरणात परीक्षा द्यावी

नांदेड | महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्यावतीने इयत्ता दहावीच्या वार्षिक परीक्षा येत्या 21 फेब्रुवारी ते 17 मार्च कालावधीत घेण्यात येणार आहेत. परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त व आनंददायी वातावरणात परीक्षा द्यावी. आपले भविष्य उज्वल करण्यासाठी गुणवत्ता पूर्ण शिक्षण खूप महत्वाचे आहे. परीक्षा केंद्र परिसरात जमावबंदीचे कलम लागू असल्याने पालक व इतर नागरिकांनी परीक्षा केंद्र परिसरात अजिबात थांबू नये तसेच झेरॉक्स मशीन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य सुरु ठेऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

इयत्ता 10 वीच्या वार्षिक परीक्षेचे नियोजन केले असून जिल्ह्यातील 172 परीक्षा केंद्रावर 48 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षा देणार असून 172 बैठेपथक असणार आहे. तालुका स्तरावरील विभागप्रमुख यांचे भरारी पथक आणि जिल्हा स्तरावरील भरारी पथक परीक्षा केंद्राना भेटी देणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे बोर्डाच्या 12 वीच्या वार्षिक परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 पासून कॉपीमुक्त वातावरणात सुरु झाल्या आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार परीक्षा सुरु झाल्यापासून परीक्षा केंद्राना भेटी देत आहेत. महसूल विभाग, जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील विविध विभागाचे विभाग प्रमुख अधिकारी परीक्षा केंद्राना भेटी देत आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!