Free vocational education ; मुलींना आता व्यावसायिक अभ्यासक्रमाचे मोफत शिक्षण – NNL
नांदेड| व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्टया दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग तसेच इतर मागासवर्ग प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्कात 50 टक्के ऐवजी आता 100 टक्के लाभ मंजूर करण्याबाबतचा निर्णय 8 जुलै रोजी राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे नांदेड विभागातील जवळपास 10 हजार मुलींना याचा लाभ होणार असून जास्तीत जास्त मुलींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक किरणकुमार बोंदर यांनी केले आहे.
आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील अनेक मुलींना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे अनेक मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहत राहण्याची शक्यता होती. मुलींना मोफत उच्च शिक्षण या योजनेत आता त्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे. नांदेड विभागात एकूण 97 अनुदानित महाविद्यालय, 219 विनाअनुदान...
