Bjp Mp Ashok chavan ; राज्यात नांदेडची भाजपा सदस्य नोंदणी सर्वाधिक असेल – माजी मुख्यमंत्री खा .चव्हाण यांचा विश्वास -NNL
नांदेड, अनिल मादसवार। नांदेड जिल्हा हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला हाेता. परंतु, केंद्रात नरेंद्र मोदी व राज्यात महायुती सरकारने केलेल्या लाेककल्याणकारी कामांमुळे नांदेडमध्ये भारतीय जनता पक्ष व महायुतीसाठी जनतेच्या माध्यमातून अच्छे दिन आले असून विधानसभेत सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा विक्रम महायुतीने केला आहे. महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाची आॅनलाईन सदस्य नाेंदणी सुरु झाली असून नांदेड जिल्हा यामध्येही आघाडीवर असेल. राज्यात सर्वाधिक सभासद नोंदणी चा विक्रम जिल्ह्याच्या नावावर आपण करु, असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशाेकराव चव्हाण यांनी येथे व्यक्त केला.
नांदेड उत्तर ग्रामीण भाजपाच्या वतीने येथील कुसुम सभागृहात आयाेजित केलेल्या भाजपा सभासद नाेंदणी कार्यशाळेचे उदघाटन करताना ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाेलत हाेते. यावेळी व्यासपीठावर या माेहिमेचे समन्वयक म...
