Pilgrimage Balirampur ; तिर्थक्षेत्र बळीरामपूरच्या विकासाकरीता आ. मोहनअण्णा हंबर्डे यांनी केला 25 लाख रुपयाचा निधी मंजूर – NNL
नवीन नांदेड | शहरापासून जवळच असलेल्या बळीरामपूर येथील तिर्थक्षेत्र श्री संत गुरु रोहिदास महाराज मंदिराच्या विविध विकास कामांकरीता नांदेड दक्षिणचे कार्यसम्राट आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांनी 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असून, त्यामुळे तिर्थक्षेत्राचे विश्वस्त व समाज बांधवांतून आ. मोहनअण्णा हंबर्डे यांचे अभिनंदन होत आहे.
शिख बांधवांचे दहावे गुरु, गुरुजी श्री गुरु गोविंदसिंघजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नांदेड नगरीत तसेच गोदावरी मातेचे वरदान लाभलेल्या नांदेड नगरीत जगातील पवित्र ग्रंथ आदि गुरुग्रंथ साहिबजी यांच्या केवळ अस्सिम कृपेने व प्रेरणेने, महाराष्ट्रातून प्रथमतः नांदेड नगरीलगत बळीरामपूर या ग्रामीण भागात महामानव श्री संत गुरु रोहिदास महाराज मंदिर ट्रस्ट बळीरामपूर नांदेडची रितसर नोंदणी मा. धर्मादाय आयुक्त कार्यालय नांदेड येथील कार्यालयात दि. 15 डिसेंबर 1983 रोजी करण...
