संजय गांधी निराधार व श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे अर्थसहाय्य वितरित – NNL
नांदेड| जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या सूचनेनुसार नांदेड महानगरपालिका क्षेत्रातील संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे होणार आहे.
त्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याच्या पहिल्या पानाची पासबुकची झेरॉक्स ,आधारकार्डची झेरॉक्स, दिव्यांग प्रमाणपत्र, दुर्धर आजार असेल तर त्याबाबतचे प्रमाणपत्र, मोबाईल नंबर इत्यादी तलाठी शेळके व श्रीमती बोकन संजय गांधी शहर योजना यांच्याकडे अथवा संजय गांधी निराधार योजना कार्यालय, नांदेड शहर जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे 25 जून 2024 पर्यंत जमा करावेत असे आवाहन तहसिलदार संजय गांधी योजना नांदेड शहर यांनी केले आहे.
आजपर्यंत 2 हजार 522 लाभार्थ्यांनी कागदपत्रे कार्यालयात जमा केली आहेत. अजून 4 हजार 117 लाभार्थ्यांचे कागदपत्रे जमा करावयाची शिल्लक आहेत .जे लाभार्थी विह...
