Mla Baburao Kadam Demands : हदगाव-हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टी व महापूरामुळे शेतकऱ्यांचे १००% नुकसान
मुंबई/नांदेड, अनिल मादसवार | नांदेड जिल्ह्यातील हदगाव -हिमायतनगर तालुक्यातील अतिवृष्टी व महापूरामुळे शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले असून, त्यांचे पंचनामे करून तातडीने सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी, अशी ठाम मागणी हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तसेच महसूल मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
इसापूर धरणाचे तब्बल १३ दरवाजे उघडल्यामुळे, तसेच हदगाव तालुक्यात १५८ मि.मी. व हिमायतनगर तालुक्यात तब्बल २३२ मि.मी. पावसाची नोंद झाल्याने नदीकाठच्या गावांमध्ये आणि ओढे-नाल्यालगतच्या शेतजमिनींमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. परिणामी शेतकऱ्यांचे उभे पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. विशेषतः ऊस, सोयाबीन, कापूस, तूर व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी वर्ग गंभीर आर्थिक संकटात सापड...
