Gram Panchayat ; ग्रामपंचायत स्तरावर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावीपणे अमलबजावणी
नांदेड l ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायत स्तरावर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत सर्व विभागांनी अधिसूचीत केलेल्या सेवा आपले सरकार सेवा केंद्रामार्फत नागरीकांसाठी उपलब्ध करून देण्यास मंजूरी दिली आहे.
नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागात 816 आपले सरकार सेवा केंद्र आहेत. येत्या 1 मे पासून ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्रामार्फत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत अधिसूचित केलेल्या 536 सेवा नागरीकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांनी ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्रामार्फत सर्व सेवा उपलब्ध करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागा मार्फत करण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा कायदा राज्यभरात 28 एप्रिल 2015 पासून लागू करण्यात आला आहे. 28 एप्रिल 2025 रोजी सदर कायद्याचे अंमलबजावणीस 10 व...
