The health system : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडणार
नांदेड| राष्ट्रीय आरोग्य अभियानातील मागील २३ वर्षापासून कार्यरत करार तत्वावरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेऊन सुद्धा अद्यापही याची अंमलबजावणी न करणे व कर्मचारी संघटनेच्या मागण्यांकडे डोळे झाक करणे या बाबीस कंटाळून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कंत्राटी कर्मचारी एकत्रितपणे येत्या १९ ऑगस्ट २०२५ पासून बेमुदत संपावर जाणार असून यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडणार आहे.
सदर संघटनेच्या वतीने नुकतेच जिल्हाधिकारी ,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी ,जिल्हा शल्यचिकित्सक आदि आरोग्य विभागाच्या प्रमुखांना संघटनेच्या वतीने निवेदन देऊन संघटना संप पुकारणार असल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले आहे
.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रमुख पुढाकारातून राष्ट्रीय आरोग्य अभियान ग्रामीण व शहरी विभागातील नांदेड जिल्ह्यातील विविध संघटनांच्या कार्यरत अधिकारी व...
