नांदेडलेख

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग 11(लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

वैष्णोदेवीचं पवित्र दर्शन आणि मनाशी बांधलेली प्रतिज्ञा
ग्रँड श्ररीन हॉटेल मधील वातानुकुलीत सुसज्ज रूम मध्ये भरपूर आराम झाल्यामुळे थकवा निघून गेला.कटऱ्याच्या शांत पहाटेची वेळ पाच वाजता. हॉटेलबाहेर यात्रेकरू सज्ज, “पायी जायचंय! वैष्णो देवीच्या दर्शनासाठी!”अनेकांनी RFID कार्ड आधीच घेतलेलं होतं.उरलेल्यांनी बसस्टँडजवळील अधिकृत सेंटरवर आधारकार्ड दाखवून RFID कार्ड घेतले. हॉटेल ते बसस्टँड ते बाणगंगा पर्यंत प्रति ऑटो ₹ 250 देऊन प्रवास केला.

बाणगंगा पुढे कोणतीही वाहतूक जात नाही. डोली, घोडे करण्याऱ्यांना आधीच सूचना “धडा घ्या, कितीही पैसे मागितले तर आधी हो म्हणा, पण पैसे फक्त देवस्थान दरांनुसार द्या! नसेल ऐकत, थेट मिलिट्री वाल्यांकडे तक्रार करा!” राजेशसिंह ठाकूर, माधवी व मनोज जोशी, वसुबेन व जयंतीलाल पटेल यांना घोडा तर सुधाकर केंद्रे ,बालाजी ढाकणे यांना अधिकृत दरात डोली ठरवून दिली.प्रत्येकाच्या डोक्यावर “जय मातादी” पट्टी,अमरनाथ यात्रेचा टी-शर्ट, हातात काठी,आणि चेहऱ्यावर शक्तिचा ओसंडणारा भक्तिभाव!

ढोलाच्या गजरात, एक पवित्र पदयात्रा
आधीच बुक केलेले दोन ढोलवाले आमच्यात सामील झाले आणि सुरू झाला भक्तीचा नाद! माझ्यासह जयप्रकाश येवले,माधव बामणे, रमेश जटाळे, सपना व राजू सतलावार,शार्दूल, श्रवरी, रुपाली व शैलेश वडजकर,रविंद्र केंद्रे,राधा व सुरेश घुगे, अरुणा व दिगंबर गिरी,मीरा व सुभाष वानोळे,व्यंकटेश जामकर, विशाल पवार, साईनाथ व शंकर कासटवार,छाया व ऊध्दव केंद्रे, अनीता ढाकणे,सुवर्णा केंद्रे,जयमाला लटपटे,गीता व दत्ता पावडे, सुनिता जैन ही सर्व मंडळी ढोलाच्या तालावर नाचत-गात “जय मातादी” चा जयघोष करत चढत होती.ढोलकीवाल्यांचे मानधन सुनील व्यवहारे यांनी दिले.विशेष उल्लेख, सुभाष देवकत्ते यांच्या घोषणानी सर्व यात्रेकरू मंत्रमुग्ध झाले.अर्धकुंवारी नंतर प्रतीक्षा, निर्मला व पद्माकर केंद्रे, चित्ररेखा व नारायण पांडे,सुनीता व संजय कलकोटे, सुरेश व प्रेमला नागरगोजे यांनी आधीच बॅटरी कार बुक केले होते.

भक्तीची भेट, माता वैष्णवीच्या चरणी
आज रस्त्यात होणाऱ्या खाण्यापिण्याची सर्व जबाबदारी पद्माकर केंद्रे यांनी घेतली होती.३ ते ३.१५ तासांत “भवन” गाठलं.सुरक्षा नियमामुळे मोबाईल, कंगवा, बॅग्स लॉकरमध्ये ठेवल्या.लॉकर साठी फार गर्दी होत असल्यामुळे या वर्षी एक नविन व्यवस्था दिसून आली. नाविण्याचा ध्यास असलेल्या श्ररीन बोर्डाने तिथल्या तिथे व्हाट्सअप वरून लॉकर उपलब्ध करून दिल्यामुळे रांगेत उभे राहण्याचा त्रास कमी झाला.खा. अशोकराव चव्हाण साहेबांच्या पत्रामुळे आम्हा पाच जणांना डायरेक्ट दर्शन मिळाले. गुहेत माता सरस्वती, महाकाली आणि वैष्णवी यांच्या पिंडी रूपातील दर्शनासाठी सर्वजण रांगेत.

मी पिंडी समोर मी काही क्षण बाजूला थांबलो, “माता वैष्णो देवीचं शांत, नि:शब्द दर्शन घेतलं!”माझ्या गळ्यातील एकमुखी व गणेश मुखी रुद्राक्षाची माळ देवीच्या चौथऱ्यावर टेकवून परत घेतली.नेपाळ येथून आणलेली ही माळ वेगवेगळ्या देवांच्या चरणात ठेवत असल्यामुळे एक वेगळी ऊर्जा निर्माण झाल्याचा प्रत्यय अनेकदा जाणवला आहे.

भैरव यात्रा, रोपवे, डोली आणि पायवाटांची कहाणी
याही वेळेस “भवन ते भैरव” हा येण्या जाण्याचा प्रवास माधुरी व प्रवीण सराफ, विजया व दत्ता खानझोडे, कल्पना व अजय संगेवार,आशा पल्लेवार,ज्योती व सुधीर शिवणीकर,कमल व वीरभद्र जाधव, रेणुका
व अच्युत जोशी,सुरेखा व चंद्रशेखर मुंडे यांच्या सह सर्वांनी रोपवेने केला! काहींनी अनवाणी दर्शन केलं, साईप्रकाश हळदे ,ज्योती व रामेश्वर वाघमारे, सारिका केंद्रे ,जयमाला लटपटे…

भैरव हून परत येण्यासाठी अमरसिंह चौहान, सुरेश शर्मा
विमल, गोदावरी,निखिल चव्हाण,अनुराधा व जयंत जोशी ,प्रणिता कुलकर्णी,शंकर व शिल्पा मोरलवार,कांचन व नरेंद्र जोशी ,महादेव व रेश्मा पवार, सुरेश व सुप्रिया कुलकर्णी, सुधाकर व सुनीता केंद्रे हे सर्व केबल कार रांगेत उभे असतांना प्रचंड पाऊस सुरु झाला.त्यामुळे तीन तास केबल बंद होती. पाऊस उघडल्यावर केबल कार सुरु झाली. ज्योती व विनायक किन्होळकर,दुलाजी व वंदना सुर्यवंशी ,सुनील व सुनीता व्यवहारे, संग्राम व मिनाक्षी हिंगोले ,सुरेशसिंह व वंदना सद्दीवाल यांनी पायी आणि घोड्यावर प्रवास केला.

तंबाखूविरोधी प्रतिज्ञा
सुरेश नागरगोजे यांना धर्मपत्नींच्या विनंतीवरून प्रतिज्ञा घ्यायला लावली, “यापुढे कधीच तंबाखू खाणार नाही!” पत्नींनी डोळ्यांतून कृतज्ञतेचा भाव व्यक्त केला.संध्याकाळी ६ वाजता खाली आलो. हॉटेलवर पोहोचल्यावर , मसाजवाल्याची तेल मालिश, गरम पाण्याची स्नान,आणि मनःशांतीची झोप…गेल्या बावीस वर्षांपासून दर्शन झाल्यानंतर रात्रीचं भोजनदरवर्षीप्रमाणे रेखा व नवनाथ सोनवणे (उदगीरकर) यांच्या कडून प्रशस्त रूममध्ये कधी झोप लागली ते कळलंच नाही!         (क्रमश 🙂

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button