Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग 11(लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)
वैष्णोदेवीचं पवित्र दर्शन आणि मनाशी बांधलेली प्रतिज्ञा
ग्रँड श्ररीन हॉटेल मधील वातानुकुलीत सुसज्ज रूम मध्ये भरपूर आराम झाल्यामुळे थकवा निघून गेला.कटऱ्याच्या शांत पहाटेची वेळ पाच वाजता. हॉटेलबाहेर यात्रेकरू सज्ज, “पायी जायचंय! वैष्णो देवीच्या दर्शनासाठी!”अनेकांनी RFID कार्ड आधीच घेतलेलं होतं.उरलेल्यांनी बसस्टँडजवळील अधिकृत सेंटरवर आधारकार्ड दाखवून RFID कार्ड घेतले. हॉटेल ते बसस्टँड ते बाणगंगा पर्यंत प्रति ऑटो ₹ 250 देऊन प्रवास केला.
बाणगंगा पुढे कोणतीही वाहतूक जात नाही. डोली, घोडे करण्याऱ्यांना आधीच सूचना “धडा घ्या, कितीही पैसे मागितले तर आधी हो म्हणा, पण पैसे फक्त देवस्थान दरांनुसार द्या! नसेल ऐकत, थेट मिलिट्री वाल्यांकडे तक्रार करा!” राजेशसिंह ठाकूर, माधवी व मनोज जोशी, वसुबेन व जयंतीलाल पटेल यांना घोडा तर सुधाकर केंद्रे ,बालाजी ढाकणे यांना अधिकृत दरात डोली ठरवून दिली.प्रत्येकाच्या डोक...
