Nagesh Tadlapurkar ; लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे नांदेड जिल्हा जयंती मंडळ अध्यक्षपदी – नागेश तादलापूरकर
नांदेड l साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे 105 व्या जयंती महोत्सव निमित्ताने सार्वजनिक जिल्हा जयंती मंडळ व कार्यकारिणीची बैठक दि. 4 जुलै रोजी सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रीय संविधान बचाव अभियान चे अध्यक्ष प्रा. देविदास इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली व संयोजक गणेशअण्णा तादलापूरकर यांच्या प्रमुख उपस्तितीत जिल्हा जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी- अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे जिल्हाप्रमुख नागेश तादलापूरकर निवड करण्यात आली.
तसेच उपाध्यक्षपदी- अंबादास भंडारे मिनकीकर, उपाध्यक्षपदी-राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष मारोती चिवळीकर, उपाध्यक्षपदी-डीपीआय चे जिल्हाध्यक्ष रोहन वाघमारे, भगवान जाधव,मंगलसांवी ता. कंधारचे ग्रामपंचायत सदस्य सचिन कपाळे तर सचिवपदी- शिवसेनेचे उपशहर प्रमुख ईश्वर अण्णा जाधव, सहसचिवपदी- भाजपचे कार्यकर्ते पदी बंटी बारडकर, प्रा. मंगेश देवकांबळे गऊळकर, बंटी दुध...
