HomeकरियरDr. Babasaheb Ambedkar Library ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात दिवाळी अंक प्रदर्शनाचे...

Dr. Babasaheb Ambedkar Library ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात दिवाळी अंक प्रदर्शनाचे आयोजन

कंधार, सचिन मोरे l कंधार नगरपरिषद अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवीन दिवाळी अंकांचे चार दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दिनांक 25 ते 28 ऑक्टोबर 2025 दरम्यान वाचकांसाठी खुले राहणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात वाचनालयाचे सहायक ग्रंथपाल मोहम्मद रफीक सत्तार यांच्या हस्ते झाली. यावेळी जेष्ठ पत्रकार सचिन मोरे, डॉ. शंकर धोंडीबा जोगदंड, माधव कांबळे, संजय कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दिवाळी अंक पूजन व पुष्पार्पण करण्यात आले.

या प्रदर्शनात बाल, महिला व प्रौढ वाचकांसाठी निवडक आणि वाचनीय दिवाळी अंक उपलब्ध करण्यात आले आहेत. यात आवाज, जत्रा, दीपावली शतायुषी, मौज, ज्योतिष तंत्र-मंत्र भन्नाट, हेर, एकच थरार, महाराष्ट्राची जत्रा, दहावी दिवाळी अंक, ग्रहांकित, अन्नपूर्णा आदी लोकप्रिय अंकांचा समावेश आहे.

IMG 20251026 WA0000 Dr. Babasaheb Ambedkar Library ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात दिवाळी अंक प्रदर्शनाचे आयोजन

या प्रदर्शनाचा लाभ अधिकाधिक वाचकांनी घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा नगरपरिषद प्रशासक रामेश्वर गोरे, मुख्याधिकारी श्री. संदीप भोळे, आणि सहायक ग्रंथपाल मोहम्मद रफीक सत्तार यांनी केले. कार्यक्रमास वाचनालय कर्मचारी दत्ता ऐनवाड, मिलिंद महाराज, मोहम्मद समीर, श्रीमती वंदना फुले तसेच मोठ्या संख्येने वाचक उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments