बिडिओंच्या नावावर ‘नरेगा ‘ योजनेत गोंधळ ! उमरखेड पंचायत समितीतील प्रकार ! -NNL
उमरखेड, अरविंद ओझलवार। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या निगडीत असलेली नरेगा योजना उमरखेड तालुक्यात सर्वदूर राबविण्यात येत असून ही योजना मात्र अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी अर्थपूर्ण योजना ठरत आहे .पंचायत समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी चक्क बिडीओ यांच्या नावावर नरेगातील कर्मचारी पैसे उकळत असल्याचे दिसून येत आहे .
गुरांचा गोठा , सिंचन विहीर वैयक्तिक, मोहगुनी वृक्ष लागवड ,बिहार पॅटर्न वृक्षलागवड ,नाली बांधकाम, रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड , स्मशानभूमी वृक्ष लागवड , पांदण रस्ते तयार करणे , शोषखड्डे ,गांडूळ खत निर्मिती , कुक्कुटपालन शेड , शेळी पालन शेड,रोपवाटिका ,फळबाग , मच्छी तलाव यासह विविध हेडवर पंचायत समिती मार्फत कामे सुरू असून येथील गट सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (एपिओ )तांत्रिक अधिकारी ( पीटिओ )डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी मात्र या योजनेमध्ये गोंधळ निर्माण करू...
