नांदेड

आगामी विधानसभेची निवडणूक सर्व ताकतीनिशी लढवणार – प्रा.मनोहर धोंडे-NNL

कंधार, सचिन मोरे। गेल्या 38 वर्षापासून गोरगरीब, उपेक्षित,वंचित, शेतकरी कष्टकरी सुशिक्षित बेकार आदिवासी या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण राज्यभर फिरत आहे. शिवा संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने करत मोठा लढा उभारला. गेल्या अनेक वर्षापासून लोहा कंधार विधानसभा मतदार संघातील सर्व सामान्य जनतेचे होणारे बेहाल थांबून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी मी आगामी विधानसभेची निवडणूक सर्व ताकतीनिशी लढवून विजयश्री खेचून आणण्याचा निर्धार सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख प्रा. मनोहर धोंडे यांनी व्यक्त केला आहे.

सेवा जनशक्ती पार्टीच्या संपर्क कार्यालयात 18 जून रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रा. धोंडे पत्रकारांशी संवाद साधत पुढे बोलताना म्हणाले की” झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने 48 जागांपैकी 30 जागा निवडून दिल्याबद्दल सर्व सामान्य जनता व मतदारांचे आभार मानून सर्वांना शुभेच्छा दिल्या. “काल झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार यांच्याशी दोन वेळेस महत्वपूर्ण चर्चा करून सेवा जनशक्ती पार्टी महाविकास आघाडीचा घटक पक्ष राहील असे सर्वानुमते ठरले त्यानुसार राज्यात लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी प्रचारसभा घेऊन मोठे घवघवीत यश मिळवले.

लोहा कंधार विधानसभा मतदारसंघांमध्ये विकास फक्त कागदावरच झाला असून वाडी तांड्यावरील जनतेला कोणीच वाली राहिला नाही. रस्ते वीज व पाणीटंचाईने सर्वसामान्य जनता व्याकुळ झाली असून प्रस्थापित लोकप्रतिनिधींना कशाचेही देणे घेणे नाही. ही विधानसभेची निवडणूक सर्व ताकतीनिशी लढणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला यावेळी सामाजिक कार्यकर्ते हबुभाई बालाप्रसाद मानसपुरे हनुमंत लांडगे ज्ञानेश्वर मानसपुरे आधी सह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button